चाळीसगाव । रस्ता वाहतुकीचे नियम नागरिकांना माहिती व्हावेत यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने चाळीसगाव शहर वाहतुक शाखेच्या सौजन्याने घाट रोड स्थित अँग्लो ऊर्दू हायस्कुलतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह रॅलीचे आयोजन सोमवारी रोजी करण्यात आले. अँग्लो ऊर्दू हायस्कुलचे विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शहर वाहतूक शाखेचे स.पो.नि सुरेश शिरसाठ यांच्या सोबत पोलीस अधिकारी कर्मचार्यांसह जनजागृती रॅली काढली.
रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरो जान बचाओ, मत कर मस्ती जान नही सस्ती, गाडी धीरे चलावो आदी घोषणा देत संदेश दिले. रॅली बाजार, आंबेडकर चौक, सदानंद हॉटेल, इस्लामपूरा, घाट रोड मार्गे काढण्यात आली. रॅली मध्ये चाळीसगांव शहर वाहतूक शाखेचे स.पो.नि. सुरेश शिरसाठ, अँग्लो ऊर्दू हायस्कुलचे शिक्षक अफसर, आसिफ, गुलाम, इकबाल, अलीम, फरीद, मुदस्सीर, अमजद, मुबीन, नासिर, हुसेन, अनिस, रईस, रफिक यांचेसह, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.