भुसावळ- चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली करण्यात आली होती मात्र तीन वर्षांचा कालावधी होण्यापूर्वीच बच्छाव यांची बदली करण्यात आल्याने या बदलीमागे राजकीय दबावतंत्र वापरण्यात आल्याची चर्चा होती. बच्छाव यांनी बदलीच्या आदेशाविरोधात मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे.
कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. बच्छाव यांचीही धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक सचिन पी.गोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुळात बच्छाव यांच्या बदलीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांची बदली झाल्याने या बदलीमागे राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. बच्छाव यांनी बदलीच्या आदेशाविरोधात मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे. त्यांच्यातर्फे अॅड.धनंजय ठोके यांनी युक्तीवाद केला. बदलीला स्थगिती मिळाल्याच्या वृत्ताला बच्छाव यांनी दुजोरा दिला.