चाळीसगाव अपर पोलिस अधीक्षकपदी सचिन गोरे

0

प्रशांत बच्छाव यांची धुळे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली

जळगाव- चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक सचिन पी.गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी राज्यातील अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून त्यात बच्छाव यांच्या बदलीचाही समावेश आहे.

बच्छाव यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली !
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीला तीन महिन्यांचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे तर राजकीय हेतूने दबावतंत्राचा वापर करून ही बदली प्रेरीत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, बच्छाव हे बदलीच्या आदेशाविरोधात मॅटमध्ये जाणार की नाही? याबाबत माहिती कळू शकली नाही.