चाळीसगाव । डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येथील प्रबुद्ध नगर, महात्मा फुले नगर, मित्राटाईप, आनंदवाडी, मिलींद नगर, पंचशील नगर व माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे आदी मान्यवर आयोजित दिनांक 25 एप्रिल 2017 रोजी येथील आनंदवाडी येथे रात्री 8 वाजता राजु बागुल व सुहासिनी शिंदे यांचा भिम गितांचा जंगी सामना व डूबर्या नंबर 1 या डांसचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेशदादा पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, नारायण अग्रवाल, प्रभाकर जाधव आदींच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असुन यावेळी सुप्रसिद्ध गायक राजु बागुल (मुंबई), गायिका सुहासिनी शिंदे (मुंबई) यांचा भिमगितांचा जंगी सामना रात्री 8 वाजता होणार आहे तर डुबर्या नंबर 1 व तोंडाय आक्का स्पेशल डांस होणार आहे तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे, नगरसेविका वैशाली मोरे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, संजय जाधव, लखन पवार, शाम हिरे, अजय पवार, बाबा कदम, विकी जवराळे, संजय सोनवणे, हेमंत शेजवळ, भावडु गायकवाड यांनी केले आहे.