चाळीसगाव आयएमए शाखेला ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’

0

चाळीसगाव । इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ’बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’ चाळीसगाव शाखेला जाहीर झाले असून रविवारी मुंबईत जुहू येथे आयएमए सभागृहात विशेष सोहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानख़ेडकर, महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ.अशोक तांबे, राज्य सचिव डॉ.सिंघवी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

चाळीसगाव शाखेने वर्षभरात एकूण 18 उपक्रम राबविले. यात आरोग्य व सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. राज्यभरातून एकूण 28 शाखांनी असे प्रस्ताव दाखल केले होते. यातून चाळीसगाव शाखेची निवड झाली असून सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी पुरस्कार स्विकारले. चाळीसगाव शाखेला राज्यस्तरावरी सर्वोत्कृष्ट ब्राच असा सन्मान प्रथमच मिळाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्याची दखल घेत हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराने प्रेरणा घेऊन पुढे कार्य करणार आयएमएने सांगितले.