चाळीसगाव – चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्याहस्ते करुन संविधानाचे वाचन करुन शपथ घेण्यात आली. यावेळी डॉ. देवराम लांडे (तालुका आरोग्य अधिकारी), प्रदीप सोनवणे (आरोग्य विस्तार अधिकारी), भागवत देवरे (तालुका आरोग्य सहाय्यक), हमीद पठाण (कुष्ठतंत्रज्ञ), दिलीप वाणी ( कनिष्ठ सहाय्यक), धनंजय जाधव (पीएमडब्ल्यु ), विजय पाटील (परिचर) उपस्थित होते.