चाळीसगाव । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणुक 2014 मध्ये झाली पाहीजे होती ती 2017 मध्ये होत आहे. यानिवडणुकीपासुन आम्ही दुर होतो मात्र सामजिक बांधीलकी म्हणुन ही निवडणुक आम्ही लढवीत आहोत या संस्थेला गतवैभव निर्माण करण्याचा निर्धार आमचा असुन त्यासाठी पॅनल तयार करण्यात आल्याची माहिती परिवर्तन पॅनल प्रमुख डॉ हेमांगीताई पुर्णपात्रे यांनी शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळासाहेब चव्हाण, उद्धव महाजन, महारु बाविस्कर, भूषण ब्राम्हणकार, रविंद्र छाजेड, रविन्द्र पाटील, प्रेमचंद खिंवसरा, शरद मोराणकर, जुगलकिशोर अग्रवाल, बाळासाहेब चौधरी, कैलास सुर्यवंशी, डॉ सत्यजित पुर्णपात्रे उपस्थित होते.
निवडणुकीत परिवर्तनाचे आश्वासन
या संस्थेत राजकारण सुरु आहे हे चुकीचे असुन चांगला कारभार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले तर विद्यमान सचिव वसंत चंद्रात्रे यांनी 2009 ते 2017 या काळात केलेल्या कामांची माहिती दिली व ज्या केस कोर्टात होत्या त्या सर्व केसेस जिंकल्याचे सांगितले व माजी संचालक सुरेश स्वार यांनी मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांच्यावर आरोप करत ते पदावर असतांना एकही शैक्षणिक कोर्स सुरु न करता उलट काही सुरु असलेले कोर्स त्यांनी बंद केले, मुलींचे वसतीगृह आणुन ट्रॅक दुरुस्ती केला असे सांगणारे नारायण अग्रवाल यांनी काहीच केले नाही. त्यांच्या काळात नॅकने दिलेला दर्जा देखील ढासळला ते कॉलेज कमिटी चेअरमन असतांना वस्तीगृहाचा प्रस्ताव पाठविला बायोटेक, केमिस्ट्री लॅब, बॉटनीकल गार्डन, प्राचार्यांची सुधारित कॅबीन त्यांनी केल्याचे सांगितले. संचालक व माजी आमदार साहेबराव घोडे यांनी बोलतांना सांगितले की आम्ही ज्यांना भेटलो सभासदांशी संपर्क केला त्यावेळी नारायण अग्रवाल यांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, बोगस मतदान, निवडणुक लावण्याची तर्हा याची सभासद व मतदारांमध्ये प्रचंड चिड व संताप असुन या निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचे सांगत ते संस्थेच्या विकासासाठी कधीही बाहेरगावी गेले नाही. गेले असतील तर तसा पुरावा द्यावा संस्थेतील शिक्षकांचा स्वतःच्या संस्थेसाठी केला व त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांना मी विरोध करुन कोर्टात देखिल गेलो असल्याचे सांगितले.