चाळीसगाव -येथील एज्युकेशन सोसायटीच्या सावळ्या गोंधळाविरोधात 9 डिसेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन केले जाणार असून सोसायटीच्या सभासदांना बेकायदेशीरपणो संस्थेचे कामकाज पाहत आहे. संस्था चालकांची बेकायदेशीर कामे अव्याहतपणे सुरू आहेत. हे थांबवायचे असेल आणि संस्थेला गैरकारभारातून मुक्त करावयाचे असेल तर सभासद एकवटला पाहीजे. म्हणून 9 डिसेंबर रोजी संस्थेच्या प्रांगणात आ.बं. हायस्कूलच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम आहे. याचवेळी सकाळी 9 वाजता एकत्र येवून जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा प्रा.गौतम निकम यांनी दिला आहे. आजी माजी आमदार, नगराध्यक्ष व संस्थेच्या सभासदांनी या लढ्याज सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कायदेशीर अधिकार नसतांना सर्रास पैशाची उकळणी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीवर वेगवेगळ्या विचारधारेची वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारी लोकं सभासदांनी निवडून दिली आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. संस्थेत सुरू असलेल्या गैरकारभाराची माहिती सचिव सभासदांना पुरवित नाहीत. म्हणून अॅड. नानाभाऊ पवार यांनी आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. माहिती दिली नाही म्हणून सचिवांना अनुक्रमे 25 हजार व 20 हजार रूपये दंड झालेला आहे. तर मुख्याध्यापक अ.भि.राजपूत यांनादेखील अनिल कुडे यांना माहिती पुरविली नाही म्हणून 5 हजार रूपयाचा दंड झाला. कोणताही कायदेशीर अधिकार संस्थेला नसतांना अनुदान, फी, डोनेशनच्या माध्यमातून सर्रास पैशांची उकळणी संस्थेकडून सुरू आहे. त्याची बेकायदेशीर उधळणपट्टी केली जात आहे. संस्थेचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यानंतर वेळेत निवडणूक घेतली पाहीजे होती. मात्र तसे केले जात नाही.
विद्यमान व्यवस्थापन मंडळाची दप्तरी नोंद नाही
संस्थेचे रजिस्ट्रेशन ज्या असि. चरिटी कमिशनर यांच्याकडे झालेले आहे त्यांच्या दप्तरी आजदेखील चेअरमन म्हणून डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे व सचिव म्हणून व्ही.डी.जोशी यांचीच नावे आहेत. विद्यमान व्यवस्थापन मंडळाची त्यांच्या दप्तरी नोंदच नाही. नामंजूर घटनेनुसार निवडून आलेल्या व्यवस्थापन मंडळास संस्थेचे कामकाज करण्याचा अधिकारदेखील राहीलेला नाही. तरीदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांना लाखो रूपये खचरुन महागड्या निमंत्रण पत्रिका संस्थेकडून छापल्या जात आहेत, सभासदांची व लोकांची दिशाभूल केली जात आहे. आपल्या देशात आजोबाने कोर्टात दावा दाखल केला तर नातवाला न्याय मिळेल, अशी परिस्थीती असल्याने संस्था चालकांची बेकायदेशीर कामे अव्याहतपणे सुरू आहेत. हे थांबवायचे असेल आणि संस्थेला गैरकारभारातून मुक्त करावयाचे असेल तर सभासद एकवटला पाहीजे. याचवेळी सकाळी 9 वाजता एकत्र येवून जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा प्रा.गौतम निकम यांनी दिला आहे. आजी माजी आमदार, नगराध्यक्ष व संस्थेच्या सभासदांनी या लढयात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.