मात्र अध्यक्ष व सचिवपद दुसरीकडे; एकूण ५ डॉक्टरांचा संस्थेवर बोलबाला
चाळीसगाव । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक मतदान प्रक्रिया १२ सप्टेंबर रोजी संस्थेच्या धुळे रोड स्थित महाविद्यालयात पार पडली. मतमोजणी सकाळी ९ वाजे पासून ते रात्री १२ वाजेपर्रंत चालली. त्यात प्रगती पॅनलला एकूण १३ जागा मिळाल्या तर परिर्वतन पॅनलला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले असले तरी अध्रक्षपद त्यांना मिळाल्या आहे. महत्वाचे सचिवपद हे अपक्ष असणारे डॉ. विनोद कोतकर यांना मिळाल्याने संस्थेमधे संमिश्र असा कारभार बघायला मिळणार आहे. एज्रुकेशन सोसायटीची निवडणूक गेल्या महिनाभरापासून चांगलीच गाजत आहे.
या संस्थेत नियमबाह्य कामकाज करण्याचा आरोप विरोधाकांनी केला होता. पाच वर्षे कारभार पाहिल्यानंतर २०१४ साली निवडणूक लागून देखिल ऐण चिन्ह वाटपाच्या दिवशी निवडणूक २६ झाल्याने तेव्हापासून ही संस्था कोर्ट कचेरीच्या जाळ्यात अडकली होती. वारंवार होणारे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर अखेर १९९२च्या घटने नुसार निवडणूक जाहीर झाल्यानंतर तब्बल तिन वर्षे जस्तीचा कारभार पाहिल्यानंतर अखेर ११ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार हे जाहिर झाल्यानंतर या निवडणुकीत प्रस्थापित असलेल्या प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलची निर्मिती होवून त्यात इकडून तिकडे जाणारे काही जण वगळता थोड्या फार नविन चेहर्रांना संधी देण्रात आली.
महिनाभरापासून होता प्रचाराला होता वेग
प्रगती पॅनलचे प्रमुख विद्यमान मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारारण अग्रवाल यांनी यावेळी पॅनल निर्मिती करुन प्रचारात जोर आणत घरातील एक सदस्राला जादा उमेदवारी दिली. तसाच काहीसा प्रकार परिवर्तन पॅनल प्रमुख डॉ. हेमांगी पुणपात्रे यांनी परिवर्तन पॅनलची निर्मिती करुन पुत्र प्रेम दाखवत दोघांनी उमेदवारी घेऊन पॅनल निर्मिती केली होती.त्याच प्रकारे प्रा. किरण पाटील यांनी १० उमेदवार सोबत घेऊन उत्कर्ष पॅनलची निर्मिती केली. तसेच प्रेमसिंग राजपुत यांनी नम्रता पॅनलची निर्मिती करुन त्यांनी देखिल आठ जागेवर त्यांचे उमेदवार दिले होते. जवळपास महिनाभराच्यावर या निवडणूक प्रचाराला वेग आला होता. संस्थेचे सभासद मतदार हे तालुका, जिल्हा, व जिल्हा बाहेर असल्याने उमेदवारांची मात्र यात फार दमछाक झाली. त्यातच कधी नव्हे तेवढी या संस्थेची गेल्या तीन वर्षात बदनामी झाल्याने मतदारांना काय उत्तर द्यावेत. हा प्रश्न उमेदवारांना पडला होता. या संस्थेतील बरेचसे मतदार हे सुशिक्षीत असल्याने त्यांना वेगळे काही सांगण्याची गरज नव्हती म्हणून उमेदवारांना देखिल याची कल्पना होती.
चारही पॅनलची एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप
निवडणूक जाहिर झाल्यापासून चार ही पॅनलकडून आरोप प्रत्यारोपाच्या पत्रकबाजी द्वारे फैरी झाडल्या गेल्याने काहीची बदनामी तर काहीचे मनोरंजन झाले होते. पत्रकबाजीत कोणी काय काम केले. त्याचे श्रेय कोणी घेतले कोणी काय भष्ट्राचार केला. नियमबाह्य नोकरी भरतीत त्यासाठी घेतलेला आगाऊ पैसा त्याची खमग चर्चा मात्र जनतेत होताना दिसली चार पॅनल पैकी दोन पॅनल हे किती मतदान घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागले होते त्यांनी घेतलेल्या सर्वाधिक फटका हा परिवर्तन पॅनलला बसला असल्याचे निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. प्रगती व परिवर्तन हे दोन्ही पॅनल परिपक्र असले तरी परिवर्तन पॅनलला अवघ्या चार जागा मिळाल्या मात्र एकमेव अध्यक्ष पदाची जागा त्यानी पटकावल्याने काहीशी जमेची बाजु त्यांच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. बलाढ्य अश्या प्रगती पॅनल मधे प्रमुख म्हणून विद्यमान मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारारण अग्रवाल, योगेश अग्रवाल व त्यांचे सह एकूण १३ उमेदवार निवडूण आल्याने त्यांचे बहुमत आले असले तरी त्यांना महत्वाचे असलेले अध्यक्ष व सचिव पद मिळवता आले. नसल्याने गड आला पण सिंह गेला या उक्तीप्रमाणे त्यांची स्थिती झाली आहे.
डॉ. विनोद कोतकर दोन्ही पॅनलचे किंगमेकर
या निवडणुकीत फारसा गाजावाजा न करता आरोप प्रत्यारोप न करता शिस्तबद्ध प्रचार करणारे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉ. विनोद कोतकर यांनी सचिवपदाची बाजी मारल्याने एक प्रकारे या शैक्षणिक संस्थेत आर्श्चयाचा धक्का दिला आहे. त्यामुळे येणार्या काळात दोनही पॅनलला त्यांचे पद किंगमेकरची भुमिका बजावणारे आहेत. या निवडणुकीत अपक्ष सचिवासह एकूण पाच डॉक्टर निवडून आल्याने सतत आरोपाच्या व कोर्ट कचेरीच्या फंदात असलेल्या (आजारी) संस्थेला हे पाच डॉक्टर संस्थेला स्वच्छ, पारदर्शी, कारभार देवून नवसंजिवनी देत डॉक्टर रुपी उपचार करुन सक्षम व भक्म व निरोगी आणि बदनाम रहित बनवितील अशी चर्चा आता मतदार व जनतेमधे होऊ लागली आहे.