चाळीसगाव कृउबा समोरुन मोटारसायकल लांबवली

0

चाळीसगाव – शहरातील घाटरोड वरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ८-३० ते ९-३० वाजेदरम्यान चोरुन नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक भागवत धनगर (वय- २१) रा भोरस बु ता चाळीसगाव हे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी चाळीसगाव येथे घाटरोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शनीवार बाजार असल्याने बैल विक्रीसाठी आले होते. सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान त्यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एमएच १९, एएल ८०३०) ही मोटारसायकल कृउबाच्या गेट समोर लावुन आत काका अनिल धनगर यांच्या कडे गेले होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली त्यांनी सर्वत्र शोध घेतला मिळुन न आल्याने आज १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.