चाळीसगाव कोतकर महाविद्यालयात निरोप समारंभ

0

चाळीसगाव : येथील के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात 31 जानेवारी 2018 रोजी बारावी कला शाखेतील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य मिलींद बिल्दीकर होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस.पी. भिंगारे उपस्थित होते. निकिता मुलमुले आणी तेजस्विनी रणदिवे यांच्या स्वागत गीताने विद्यार्थीमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्र.प्राचार्य मिलींद बिल्दिकर, उपप्राचार्य एस.पी. भिंगारे, प्रा.बी.आर.येवले, प्रा.जे.एम.बोरसे, प्रा.मनिषा बोरसे, प्रा.पी.एन.शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करुन बारावी बोर्डाचा परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. तर प्रा.आर.के.घेटे आणि प्रा.आर.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे कार्यक्रमाची रूपरेषा संदर्भात मार्गदर्शन केले. तर कॉलेजचे रजिस्टर हिलाल पवार हे देखील कार्यक्रमास विशेष उपस्थित होते.

विद्यार्थी झाले भावुक
मनीषा काळे हिचा भावुक गीताने सर्व विद्यार्थी आणि मान्यवर भारावुन गेले. कॉलेज स्टॉफ आणि प्राध्यापक वृंदाचे वर्षभर आम्हाला खूप मार्गदर्शन आणी सहकार्य मिळाले असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा अजबे, समाधान महाले या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी प्रतिमा शिंदे हिने मानले.