चाळीसगाव – तालुक्यातील हिरापुर येथे चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भिलाटी भागात पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारुन ५२ पात्याच्या कॅट वर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणारे काळु रामा कापसे (२९), समाधान रामचंद्र कापसे (वय- ३०), बाबुलाल कौतीक पवार (वय- ४५), शामराव कापसे (वय- ४४), सुनिल शंकर माळदकर (वय- ३०) सर्व रा हिरापुर चाळीसगाव यांना १४८७० रुपये रोख व जुगाराच्या साधनासह ताब्यात घेवुन त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मुंबई जुगार ॲक्ट १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार विलास पाटील करीत आहेत.