चाळीसगाव घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

0

जळगाव । चाळीसगाव शहर पोलिसात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दिपक मधुकर मोरे (वय 22 रा. खरजाई ता चाळीसगाव), आकाश उर्फे अक्षय भानुदास पाटील (वय 23 रा. लक्ष्मीनगर ता. चाळीसगाव)या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चाळीसगाव शहरातील लक्ष्मीनगर सुर्यकांत यशवंतराव पवार यांच्या घरातून 28 मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरटयांने घराचा कडीकोयंडा तोडून 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे.

एलसीबीच्या पथकाची कारवाई
या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजय पाटील, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील यांनी तपासचक्रे फिरवून दिपक मधुकर मोरे, आकाश उर्फे अक्षय भानुदास पाटील या दोघांना अटक केली आहे. संशयित आरोपी आकाश उर्फे अक्षय हा हिस्ट्रीशिटर असून याच्यावर यापुर्वीचे 6 ते 7 घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.