चाळीसगाव । येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षणप्रसारक मंडळ लि. संचलित चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनीयर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्व. शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषीक संदिप फाऊन्डेशन, नाशिक, चा विद्यार्थी विवेक चित्तेने प्रथम क्रमांक पटकावला तर निर्मल कॉलेज, धुळे, येथील सतीष अहिरे ने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांकाचे बक्षीस नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी हर्षद आवटेने मिळविले.
विजेत्यांना बक्षिस वितरण
दोन प्रकारचे उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली होती. प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस मु.जे.महाविद्यालय, जळगावची विद्यार्थीनी शिवानी माळी व य.च.म. मुक्त विद्यापीठ, चाळीसगाव सेंटरचा विद्यार्थी आकाश पाटील यांच्यात विभागुन देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस जी.पी. भोसले महाविद्यालयाय, सातारा, येथील विद्यार्थी उमेश सुर्यवंशी व गरूड महाविद्यालय, शेंदुर्णीची विद्यार्थ्यीनी मनिषा शिंपी यांच्या त विभागुन देण्यात आले. सदर स्पर्धेत परिक्षक म्हणुन जळगांव येथील हर्षल पाटील, अॅड. जगदीश कुवर (शहादा), मिलींद बाफना (मुंबई), चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी रामजी यशोद व यांनी काम पाहिले. परिक्षकांच्या वतीने मा. श्री. हर्षल पाटील यांनी तर विद्यार्थ्यांमधुन आकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे संयोजक पत्रकार बांधव व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुकेश पवार यांनी मनोगते व्यक्त केलीत.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी विचारमंचावर रा.स.शि.प्र.मंडळाचे सचिव अरूण निकम, पुणे येथील सुनील चव्हाण, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, रा.स.शि.प्र. मंडळ, लिमिटेड, संचालक आर्कीटेक्ट धनंजय चव्हाण, सुधीर पाटील, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्या मुथाने, प्राचार्य एन.एम.पाटील व उपप्राचार्य शेखर देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, प्राचार्य एन.एम.पाटील व उपप्राचार्य शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश पवार व प्रसिध्दीप्रमुख प्रा. विजय शिरसाठ तसेच महाविद्यालयाचे शिक्षक बंधु भगिणी व शिक्षकेतर कर्मचारी बंधु यांनी परिश्रम घेतले.