रोकडसह ३ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला
चाळीसगाव- बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील बेडरुम मधील नव्वद हजाराच्या रोकडसह सोन्या चांदीचे असा 3 लाख ६६ हजार ९00 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री चोरून नेला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील तळेगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभुनंद सदाशिव मोरे (वय – ६०) यांच्या जावयाची सुरत येथील बडोदरा येथे प्रकृती खराब झाल्याने ते परीवारासह सुरत येथे गेले होते. मात्र २६ रोजी त्यांच्या जावयाचा मृत्यू झाल्याने ते तेथेच थांबले. २९ रोजी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला असुन आत मध्ये चोरी झाल्याची माहीती त्यांना दिली. मारे यांनी पुणे चाकन येथे राहत असलेल्या आपल्या मुलाला ही माहिती त्यांनी दिल्यावर मुलगा व सुन तळेगाव येथे आले व चोरी झाली असल्याची त्यांची खात्री झाली.
ग्रामीण पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल
३० तारखेला घरी आल्यावर त्यांनी घराची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी २८ जानेवारी रोजी रात्री 2 ते 3 च्या दरम्यान त्यांच्या बेडरुम मधील कपाटात ठेवलेले ९६ हजार रुपये रोख, साडे दहा ग्रॅमच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, ११ ग्रॅम सोन्याची पोत, ५ ग्रॅमचे कर्णफुल, ६ ग्रॅमचे २ काप, ९ ग्रॅमचे २ मंगळसूत्र, २ ग्रॅम नथ, ४ ग्रॅम टाप्स, १ ग्रॅम पिंपळपान, ५ ग्रॅमचे ६0 मणी, ५ ग्रॅम बाळी व ८ ग्रॅमचे सोन्याचे 2 तुकडे असे 2 लाख ७ हजाराचे सोन्याचे दागीणे व ६२ हजार ४०० रुपये किमतीचे चांदीचे दागीने असा एकुण 3 लाख ६६हजार ९00 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी प्रभूनंद मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर करीत आहेत.