A woman’s neck was stretched by putting her hand through the window: an incident in Chalisgaon चाळीसगाव : घरात महिला घरात झोपली असताना चोरट्यांनी खिडकीतून हात टाकत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले. बुधवार, 31 रोजी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा
ललिता अरुण चव्हाण (40, रा.शाहूनगर भडगाव रोड चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर त्या बुधवार, 31 ऑगस्ट रोजी घरात झोपल्या असताना पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास अज्ञात भामट्याने खिडकीतून हात टाकून गळ्यातील 10 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अभिमन पाटील करत आहेत.