चाळीसगाव – येथील तहसील कार्यालयासमोरील झेरॉक्स दुकानासमोरुन अज्ञात चोरट्याने हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ११.१५ ते ११.३० वाजेदरम्यान चोरुन नेली होती याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील खेर्डे येथील प्रल्हाद रघुनाथ शिरसाठ (वय -३३) हे ७ जुलै रोजी कामानिमित्त चाळीसगाव येथे आले होते सकाळी ११.१५ वाजता त्यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १२ सीझेड ४०३८) ही मोटारसायकल चाळीसगाव तहसील कार्यालयासमोरील महावीर झेरॉक्स समोर लावुन गेले होते परत ११.३० वाजता आले असता त्यावेळेत अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली होती याप्रकरणी त्यांनी फिर्याद दिल्यावरुन १५ ऑगस्ट रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप तहसिलदार करीत आहेत.