चाळीसगाव तालुका भाजपाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

0

चाळीसगाव । शहरातील लक्ष्मी नगर स्थित आमदार उन्मेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष के. बी.साळुखे यांनी आमदार उन्मेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव भाजपा तालुक्यातील पदाधिकार्‍यांची निवड जाहीर करण्यात आल्या. पदाधिकारी यांना आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. पं.स. उपसभापती संजय पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, भा.ज.यु.मो. तालुकाध्यक्ष रोहण सुर्यवंशी, संजूतात्या पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, राजेंद्र पगार, शेषराव चव्हाण, कैलास गावडे, व भा.ज.पा. पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

तालुका कार्यकारिणी सदस्यांनी निवड याप्रमाणे
तालुका सरचिटणीसपदी प्रा.सुनिल राजधर निकम (लोढें), सरचिटणीसपदी अनिल विश्‍वास नागरे (रोहीणी), सरचिटणीसपदी धनंजय सुकदेव मांडोळे(खडकी बु॥), सांस्कुतिक आघाडीच्या अध्यक्षपदी पराग कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी आमदार उन्मेश पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍याचे अभिनंदन करून पक्ष संघटन मजबुत करण्याचे व पक्ष वाढ करण्याचे आवाहन केले.