चाळीसगाव। तालुक्यातील तळेगाव शिवारात गावठी दारु तयार करण्याची भट्टी असल्याची गोपनीय बातमी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाल्यावरुन छापा मरुन 33 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीसांनी यावेळी 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हेड कॉस्टेबल मनोहर जाधव, पोलीस नाईक महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोई यांनी छापा मारला. त्यांना 210 लीटर तयार दारू, 100 लीटर उकळते रसायन व 4 हजार लीटर कच्चे रसायन मिळुन आले. आरोपी भावडू मोरे, अशोक मोरे, दादाभाऊ मोरे, राजू मोरे यांच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.