Attempted rape of a minor student in Chalisgaon Taluka : Murderer sentenced to five years चाळीसगाव :अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्या संशयीत विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (20, रा.दहिवद, ता.चाळीसगाव) यास जळगाव न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व पंधरा हजार रुपये दंड सुनावला. हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालला.
2016 मधील धक्कादायक घटना
पीडित अल्पवयीन मुलगी 16 फेब्रुवारी 2016 दुपारी तीन वाजता चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत असताना इतर मैत्रीणींसोबत लघुशंकेसाठी गेली असता आरोपी विशाल याने दोन मुलींना पकडून छेड काढली. यानंतर एका मुलीने त्याच्या हाताला चावा घेत आपली सुटका करुन थेट शाळेत पळत गेली. यानंतर शाळेतील शिक्षक घटनास्थळी आले तेव्हा विशाल बलात्कारच्या प्रयत्नात असतांना पिडीतेची सुटका झाली.
11 साक्षीदार तपासले
या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात कलम 354, 376 सह 511 तसेच पोक्सोचे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी जे.आर.सातव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी 11 साक्षीदार तपासले. यात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शिक्षक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. अॅड.. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे पाहून विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले. बचावपक्षातर्फे अॅड.संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.