चाळीसगाव । येथे तहसिल कार्यालय सभागृहात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार 31 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत वैयक्तिक दाव्यांबाबत पुढील रुपरेषा ठरविण्यात येऊन नविन वनहक्क समित्या गठीत करणे, दावे तपासणे, वनदावे दाखल गावांना बैठकांचे आयोजन करण्याबाबत बैठकीत ठरले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी तालुक्यातील वनहक्क दाव्यांबाबत संथ गतीने सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत व संबधीत अधिकारींच्या उदासिनतेबाबत नाराजी व्यक्त करून वनदाव्यांचा त्वरीत निपटारा करुन योग्य वनदावेदारांचे दावे मंजुर करुन त्यांना न्याय द्यावा असे म्हटले. तर तहसिलदार कैलास देवरे यांनी यंत्रणा व लोकसंघर्ष मोर्चात योग्य समन्वय ठेवून लवकरात लवकर वनदावे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सांगितले.
यांची होती उपस्थित
या बैठकीस पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, काँम्रेड देविदास बोदार्डे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी लोकसंघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड,सोमनाथ माळी, कारभारी पवार, अशोक सोनवणे, आत्माराम पवार, तसेच वनविभागाचे, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व वनदावे प्रलंबित असलेले दावेदार व लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.