चाळीसगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीवर महिलाराज

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील एकूण 8 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात पातोंडा, ओझर, दहिवद, तळेगाव, माळशेवगे, वडाळा-वडाळी,चिंचगव्हाण आणि पिंप्री बु प्र.चा. या ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीसाठी एकूण 81 टक्के मतदान झाले होते. तहसीलदार कैलास देवरे यांच्या उपस्थितीत मजमोजणील सुरूवात करण्यात आली.

निवड झालेल्या नवनियुक्त सरपंच याप्रमाणे
पातोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 17 जागांसाठी निवडणूक झाली यात सरपंचपदी रेखा पांडूरंग माळी (2723) मते मिळून विजयी झाल्यात. ओझर ग्रामपंचायतीत (12 जागा) सरपंचपदी लता भास्कर झोगडे (1195), दहिवद (14 जागा) सरपंचपदी सुरेखा भीमराव पवार (2006), तळेगाव (14) सरपंचपदी सारीका संतोष राठोड (1300), माळशेवगे (10 जागा) सरपंचपदी बेबाबाई डिगंबर मोरे (837), वडाळा-वडाळी (12 जागा) सरपंचपदी सुनंदा अशोक आमले (1310), चिंचगव्हाण (10 जागा ) सरपंचपदी अनिता सुभाष राठोड (762) आणि पिंप्री बुदुक प्र.चा. सरपंचपदी कविता महेंद्रसिंग देवरे (758) यांची निवड करण्यात आली.