चाळीसगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले : दोघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचा राग येऊन दोघांनी मुलीला पळवून नेले.थरारक घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी घोडेगाव येथून विवाहासाठी स्थळ आले होते व ही गोष्ट वर्षभर चालली मात्र सदर स्थळ मुलीच्या वडिलांना पसंत पउले नाही त्यामुळे समोरील मंडळीस त्यांनी स्पष्टपणे नकार दिला मात्र याचा राग आल्याने भावी वरासह एकाने माझ्या मुलीला पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करीत पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात संशयीत आरोपी जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड (दोन्ही रा.घोडेगाव, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.