चाळीसगाव । तालुक्यात विविध ठिकाणी तीन जणांची वेगवेगळ्या घटनेत मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी 6 रोजी घडली. पहिल्या घटनेत करजगाव येथील सुरेश सुपडू पाटील या 30 वर्षीय तरुणांचा पहाटे 6 वाजेच्या सुमारास विजेचा धक्काने मृत्यु झाला. उपचारासाठी त्याला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याला मृत घोषीत करण्यात आले.
तिसर्या घटनेत एकाला हृदयविकाराचा झटका
करगाव येथील सुभाष काशिनाथ काळे या 42 वर्षीय इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने रात्री 3.30 वाजेच्या सुमारास मृत्यु झाले. तर भोरस गायरान येथील भावडू युवराज गायकवाड या 32 वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने त्याला उपचारार्थ धुळे येथे नेण्यात आले होते. धुळे येथे जात असतांना रस्त्यातच तो मरण पावला. चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, पो.ना.दीपक ठाकूर, भुपेश वंजारी करीत आहे.