चाळीसगाव (गणेश पवार) : एके काळी वडापाव हे मुंबईकरांचे खाणे आहे. अर्धी मुंबई वडापाववर चालते, असे लोक आवर्जून सांगत असत, मात्र पाववड्याने ग्रामीण भागातही लोकप्रियता मिळवत अनेकांना भुरळ पाडली असून छोटे शहर व ग्रामीण भागात पाववड्याचा धंदा कमालीचा वाढला असून त्यामागे खवय्यांना जिभेचे चोचले तर मिळत आहे सोबत त्यामागे अनेक कुटूंबांना रोजगार देखील मिळत आहे.
चाळीसगाव शहरात महत्वाच्या ठिकाणी त्या बसस्थानक परीसर, रेल्व स्टेशन, सिग्नल चौक, कॅप्टन कॉर्नर, जैन मंदीर, स्टेशन रोड परीसर, हॉटेल दयानंद चौक, शिवाजी घाट, रथ गल्ली, घाट रांड, कृषी उत्पन्न बाजार सामिती परीसर, धुळे मालेगार रोड, डेरा बर्डी आदी ठिकाणी पाववड्याच्या गाड्या व दुकाने थाटली गेली आहेत. या ठिकाणी पाववडे खाणारे खवय्ये नेहमी गर्दी करत असतात. पाववड्याची चव ही न्यरीच असल्याने तो खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यातच मिसळ, फाफडा, चायनिज, साऊथ इंडीयन नास्ता यांचे भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वसाधारण व्यक्ती व गरीब जनतेचा कौल हा स्वस्त मिळणार्या वडापावकडे जास्त दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या पाववड्याची लोकप्रियता वाढत असल्याने अनेक हॉटेलच्या धंद्यांवर परीणाम दिसत आहे.
अनेकांनाही मिळतोय रोजगार
पर्यायाने हॉटेल व्यावसायिक देखील आता त्यांच्या हॉटेलामध्ये पाववडा विक्रीसाठी ठेवतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनता खरेदी अथवा इतर कामांसाठी शहरात आल्यानंतर त्यांचा चवीचा व स्वस्त मिळणारा पाववडा खाण्याकडे जास्त कल असल्याने त्या गाडी अथवा दुकानांवर ग्रामीण भागतील ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. हॉटेलमध्ये 30 ते 40 रूपयाचा नास्ता मिळत असतांना अवघ्या 10 ते 15 रूपयात पाववड्याच्या माध्यमातून जिभेची चव व भूक भागत असल्याने जनतेच्या कौल सध्या पाववड्याकडे दिसून येत आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार व्यवसाय मिळाला असून अनेक कुटूंबाचा उदारनिर्वाह या माध्यमातून होतांना दिसत आहे.