चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनेतील तिघांचा धुळे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला यात तिरपोळे गावाजवळील शेतात दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केलेल्या 26 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. तालुक्यातील सायगाव येथे स्टोव्ह वर स्वयंपाक करीत असतांना स्टोव्ह चा भडका झाल्याने एका अठरा वर्षीय मुलीचा भाजून मृत्यू झाला तर मेहुणबारे परीसरातील गिरणानदीवर 55 वर्षीय बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मेहुणबारे पोलीस स्टेशन ला 3 वेगवेगळ्या अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.
पहिल्या घटनेत 21 मार्च 2017 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील तिरपोळे गावाजवळील शेतात दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केलेला कोळगाव पिंप्री ता भडगाव येथील 26 वर्षीय तरुण रोहिदास रामदास कांबळे मिळून आला होता. त्याचे वर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतांना 22 मार्च 2017 रोजी सकाळी 8:50 वाजता त्याचा मृत्यू झाला असून डॉ शाळीग्राम दामू निकस
धुळे यांचे खबरी वरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला 19/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार नरेंद्र सरदार करीत आहेत.
दुसर्या घटनेत 7 मार्च 2017 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तालुक्यातील सायगाव येथे स्टोव्ह वर स्वयंपाक करीत असतांना स्टोव्ह चा भडका झाल्याने कु शीतल विठ्ठल जगताप (18) हि तरुणी गंभीर भाजली होती. तिला उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना 23 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5:30 वाजता तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रवीण विठ्ठल जगताप (18) रा सायगाव ता चाळीसगाव यांचे खबरीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला 20/17 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार भालचंद्र पाटील करीत आहेत.
तिसरा घटनेत 23 मार्च 2017 रोजी 11:30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मेहुणबारे गिरणा नदी पुलाजवळ बेशुद्ध अवस्थेत एक अंदाजे 55 वर्षीय इसम मिळून आला होता त्यास हिरे मेडिकल कॉलेज धुळे शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर उचार सुरु असताना दि 24 मार्च 2017 रोजी रात्री 2 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिरे मेडिकल कॉलेज चे डॉ विजय सदाशिव सूर्यवंशी यांनी खबर दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला 21/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार भाऊसाहेब पाटील करीत आहेत.