चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

0

चाळीसगाव | वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील वाघडु चाळीसगाव रोडवर गुप्ताजी सोडा वॉटर कारखान्या जवळ चाळीसगाव अफ्फु गल्लीतील भास्कर गुलाबराव जाधव हा 60 वर्षीय इसम दुपारच्या सुमारास पडला होता. त्यास 108 रुग्णवाहिकेने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सदर इसम हा आई समवेत अफ्फु गल्लीत राहत होता व वेडाच्या भरात कुठेही फिरत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांचे खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिघांचा ठरला घाताचा वार
दुसर्‍या घटनेत चाळीसगाव शहरातील धनगर गल्लीतील रहिवासी हनुमंत सुकदेव गायके (33) यांनी 17 मे 2017 रोजी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान राहते घरी गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना 18 रोजी रात्री 1 वाजता मयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर तिसर्‍या घटनेत वाघळी ते कजगाव रेल्वे स्थानकादरम्यान खांब क्र 339/11/13 च्या दरम्यान डाऊन रेल्वे लाईन वर 18 मे 2017 रोजी दुपारी 12 वाजेपूर्वी रेल्वे खाली सापडून अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाघळी रेल्वे स्टेशन चे प्रबंधक यांनी खबर दिल्या वरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.