चाळीसगाव : प्रत्येक गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असून उघड्यावर शौच विधीपासून गावे मुक्त व्हावीत म्हणून ओ.डी.एफ. संकल्पना राबविण्यात येत आहे. यात चाळीसगाव तालुक्यातून 4 गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी (राजापूर) येथील प्रकाश यात्री संस्थेचे हागणदारी मुक्त तपासणी पथक चाळीसगावात दाखल झाले आहेत. यापथकात प्रकल्प समन्वयक सुधीर विचारे व कमिटी सदस्य प्रदीप सोनकर, वल्लभ निरगुळे, वंदना शिंदे, उत्कर्षा सावंत व प्रणाली मसुरकर यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व गावे 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्यासाठी ओडीएफ संकल्पना राबविण्याबाबत सूचना केल्या आहेत.