तालुक्यातील गावांना मुलभूत सुविधा योजनेंतर्गत ६८ गावांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होणार
आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून या गावांचा कायापालट होण्यास मदत
चाळीसगाव – मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधे अंतर्गत विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.उन्मेशपाटील यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली होती.या निवेदनाची दखल घेत ग्रामविकास विभागाने २५-१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत तालुक्यातील ६८ गावांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे या गावांच्या भौतिक सुविधा मध्ये वाढ होणार असल्याने या ग्रामीण भागात आनंद व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निधी
जळगाव जिल्ह्यात झालेल्या निधीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी १० लाख, ११ गावांना सुसज्ज व्यायामशाळा बांधकामासाठी ८० लाखांचा निधी, २६ बंजारा तांड्यांना स्मशानभूमी बांधकाम तसेच ८ गावांना सामाजिक सभागृह व रस्ता सुधारणा कामासाठी निधी मिळून एकूण पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्याला सर्वाधिक निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार उन्मेश पाटील यांनी वरिष्ठ मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
या गावांना निधी
ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्यात रांजणगाव, पिंपळवाढ म्हाळसा, खरजई, वलठाण, सांगवी, बाणगाव, शिंदी, न्हावे, खडकीसीम, पिंप्री बु.प्रदे. गणेशपुर, ओझर, हिंगोणे खु, लोंढे आदी गावांचा समावेश आहे.
तसेच व्यायामशाळा बांधकामासाठी ७ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले. यात गोरखपूर तांडा, वाघडू, वाकडी, अंधारी, वडगाव लांबे, शिरसगाव, टाकळी प्र.चा, भामरे, चिंचगव्हाण, पाटणा, तसेच मेहुणबारे गावाला १० लाख असा ८० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याच प्रमाणे वर्षानुवर्ष विकासापासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील बंजारा तांड्यांना स्मशानभूमी सारख्या मुलभूत सुविधा देखील आजतागायत उपलब्ध न होऊ शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेत तालुक्यातील लोंढे, तलोदे, लोंढे दरा तांडा, तळोदे दिगर तांडा, हातगाव तांडा, करजगाव तांडा, हिरापूर तांडा, नाईकनगर तांडा, पिंपळगाव, विष्णु नगर तांडा, वसंत नगर तांडा, ३२ नंबर तांडा, अंधारी तांडा, चैत्यन्य तांडा, तरवडे तांडा, दीप नगर, हातेले तांडा, लोंजे, पथराजे, शामवाडी, सुंदर नगर तांडा, राजमाने तांडा, आभोने तांडा, रोकडे तांडा, कोंगा नगर तांडा, सोनगाव तांडा आदी बंजारा तांड्यांना प्रत्येकी ५ लक्ष व वरखेडे तांडा १ व वरखेडे तांडा २ यांना ७ लक्ष स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
आठ गावांना सभामंडप मंजूर
तसेच तालुक्यातील पुढील ८ गावांना सामाजिक सभागृह / सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. त्यात जूनवणे, देवळी, हातगाव, कृष्ण नगर तांडा, बोरखेडे खुर्द, पोहरे, बहाळ, खेडगाव, पिंपळवाडी येथे रस्ता सुधारणा करणे साठी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बोधारे रस्ता व गटार, तळोदे प्रदे अलवाडी – देशमूखवडी शिवरस्ता, कलमडू, टाकळी, हरिनगर, पिंपळवाढ निकुंभ येथे रस्ता सुधारणा व हींगोणे खुर्द रस्ता सुधारणा करणे असा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.