चाळीसगाव दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

0
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांचे शुभहस्ते शुभारंभ  
चाळीसगाव  – येथील न्यायालयातून वकिलीस प्रारंभ करणारे माझे सहकारी न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांचा भक्कम पाठपुराव्यामुळे दिवाणी न्यायालयाचा शुभारंभ होत असून चाळीसगाव बार असोशियशन चा प्रयत्नांना यश आले आहे.  भविष्यात पक्षकार व वकिलांची मोठी गैरसोय टळणार आहे त्यांचे वेळ व ऊर्जा वाचणार आहे असा विश्वास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय वि गंगापुरवाला यांनी आज येथे केले.
त्यांच्या हस्ते वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण  आज सकाळी 11 वाजता करण्यात आले. व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील , जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गोविंदा सानप, नवनियुक्त वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेण, चाळीसगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालगायिका स्नेहल सापनर हिने स्वागत गीत सादर केले दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले प्रास्तविकातून राहुल पाटील यांनी येथील न्यायालयाच्या वाटचालीचा व नव्याने सुरू होत असलेल्या दिवाणी न्यायालयासाठी केलेल्या संघर्ष व योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला.