चाळीसगाव-धुळे पॅसेंजरची एक फेरी रद्द

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील चाळीसगाव-धुळे दरम्यान अभियांत्रिकी विभागातर्फे तांत्रिक कामे करण्यासाठी अप 51115 चाळीसगाव-धुळे पॅसेंजरची 1.40 वाजेची तसेच डाऊन 51114 धुळे-चाळीसगाव दरम्यान सकाळी 11.40 वाजता सुटणारी पॅसेंजर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सहा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.