जळगाव : शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले. दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्वर वामन मिस्तरी (45) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होते व गावातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून नोकरीस होते. सोमवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी पत्नी लताबाई आणि मुलगा मयूर यांच्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी ते आले असता त्यांनी शहरातील गांधी मार्केटजवळील रहिवासी आपल्या बहिण शोभाबाई राजाराम मिस्तरी यांच्याकडे भेट दिली. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या बहिणीला आपण रुग्णालयात जात असल्याचे सांगून घर सोडले मात्र गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात ते गंभीर जखमी झाले.
जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
ज्ञानेश्वर मिस्तरी यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर मिस्तरी यांचा उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई, मयूर, प्रतिक, अभिषेक तीन मुले असा परीवार आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.