चाळीसगाव । चाळीसगाव नगरपरिषदेतील वारस हक्काने अनुकंपावर काम करीत असलेले 21 कर्मचारी कायम सेवेत रुजू झाले असुन तशा आशयाचे कायम नियुक्ती पत्र 28 ऑगस्ट रोजी आमदार उन्मेश पाटील, नगराध्रक्षा आशालता चव्हाण, रमेश चव्हाण रांच्रा उपस्थितीत देण्रात आले. यात पंकज देशमुख, उमेश देशमुख, दिपाली देशमुख, तुषार माने, राजेंद्र चौधरी, विनोद जाधव, मनोज पगारे, संदीप परदेशी, मयुर पगार, मयुर वाघ, अनिल गवळी, तिलक पाटील, सुरेश गुजर, मेहमुद मिर्झा, प्रशांत सोनवणे, भूषण लाटे, प्रशांत निकम, कपिल पगारे, आबा शिंगटे, धिरज राजपुत व संध्या कोळी हे 21 कर्मचारी काम करीत होते. नियमानुसार त्यांना कायम करणे आवश्यक असते.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी व कर्मचारी अहिरराव यांनी पाठपुरावा केला व आमदार उन्मेश पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने अखेर वरील 21 कर्मचारी कायम झाले असुन त्यांना कायम नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, अभिरंता राजु पाटील व नगरसेवक कर्मचारी उपस्थित होते.