चाळीसगाव – येथील नगर परिषदेचे कर्मचारी आजपासून आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. आज सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज धरणे आंदोलन करीत घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. यावेळी जवळपास ३२८ कायम कर्मचारी, १६६ रोजंदारी तसेच २० हंगामी कर्मचारी संपात सामील झाले आहेत.