चाळीसगाव नगरपालिका समिती सभापती निवड बिनविरोध

0

चाळीसगाव । चाळीसगाव नगरपालिकेच्या विषय समितींच्या सभापती पदाची निवड दि 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली असून पाच विषय समित्यांच्या सभापती पदी भाजप – सेनेच्या पाच नगरसेवकांची वर्णी लागली असून ही निवड बिनविरोध झाली आहे. वेळेआधी विरोधी पक्षाच्या वतीने अर्ज माघारी घेतल्याने पिठासीन अधिका-यांनी ही निवड जाहीर केली आहे. चाळीसगाव नगरपालिकेच्या विषय सभापतीच्या निवडीची प्रक्रीय 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11:15 वाजेदरम्यान नगरपालिकेच्या सभागृहात सुरूवात झाली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार यांनी कामकाज पाहीले तर सहकारी म्हणून मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालिंसग, नगराध्यक्षा आशालता चव्हाण व उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांनी कामकाज पाहीले.

शहर विकास आघाडीतर्फे माघार सकाळी 9 ते 11 यावेळेत विषय समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजया प्रकाश पवार, घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, शामलाल वामनराव कुमावत, शेखर बजाज व विजया भिकन पवार यांनी अर्ज दाखल केले होते तर शहर विकास आघाडीच्या वतीने दिपक पाटील, शंकर पोळ, अलका गवळी, यास्मिन मिर्झा, सुर्यकांत ठाकुर यांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्वच्या सर्व 10 अर्ज वैध ठरल्यानंतर 15 मिनीटे माघारीसाठी वेळ दिल्यानंतर 10 मिनीटात शहर विकास आघाडीच्या 5 नगरसेवकांनी आपले अर्ज माघारी घेऊन सभागृहातून बाहेर निघून गेल्याने पिठासीन अधिकारी तहसीलदार कैैलास देवरे यांनी बांधकाम सभापती पदी विजया प्रकाश पवार, आरोग्य समिती घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, पाणीपुरवठा शामलाल वामन कुमावत, शिक्षण शेखर बजाज, महीला व बालकल्याण सभापतीपदी विजया भिकन पवार यांची निवड झाल्याचे घोषीत केले. तर नियोजन समितीवर सभापती म्हणून उपनगराध्यक्षा आशाताई रमेश चव्हाण यांची निवड झाली आहे. नवनियुक्त समिती सभापतींचा नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून आ.उन्मेष पाटील यांनी सर्व निवड झालेल्यांना फोन वरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. गटनेते राजेंद्र चौधरी यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले.