चाळीसगाव । नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्यपदी सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत त्यांची निवड करण्यात आली. सभेत स्विकृत सदस्य निवडीबाबतचा प्रमुख विषय पारीत करण्यात आला, नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी आशालता चव्हाण यांनी माजी नगरसेवक सुरेश हरदास चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्यात आता शहर विकास आघाडीचे संख्याबळ आता 19 झाले आहे. मागील स्विकृत सदस्य निवड संदर्भात शहर विकास आघाडीच्या वतीने रामचंद्र जाधव आणि सुरेश चौधरी यांच्या नावाचा ठराव देण्यात आला होता.
त्यावेळी रामचंद्र जाधव यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. तांत्रिक कारणास्तव सुरेश चौधरी यांच्या नावावर जिल्हाधिकारी यांच्याकडून स्थगीती देण्यात आली होती. स्विकृत सदस्य सुरेश चौधरी यांचा शहर विकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते राजीवदादा देशमुख,उपगटनेते सुरेश स्वार, प्रतोद आनंदा कोळी, नगरसेवक रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, रविंद्र चौधरी, सुर्यकांत ठाकूर, दिपक पाटील, शंकर पोळ, नगरसेविका सविता राजपूत, गीताबाई पाटील, रंजना सोनवणे, अलका गवळी, संगीता गवळी, वंदना चौधरी, मनीषा देशमुख, यास्मिनबी बेग, योगीनी ब्राह्मणकार आदी उपस्थित होते.