चाळीसगाव- शहराचा वाढता व्यापामुळे पालिकेतील बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी जनतेची पायपीट होत होती तर बांधकाम परवानगी असून ही अतिक्रमण वाढत असल्याच्या तक्रारी ही वाढत होत्या तर अनेकदा चिरीमिरी देऊन तर कधी कधी अधिकाराचा गैरवापर करीत अश्या बांधकाम परवानगी दिली जात होती या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन दाखले देण्यात यावे यासाठी पालिकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत या अनुषंगाने आज पालिका सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते ऑनलाइन दाखल्याचा शुभारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, विरोधी पक्ष उपगटनेते सुरेश स्वार, बांधकाम सभापती चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, संगीता गवळी, वस्तलाबाई महाले, रवींद्र चौधरी, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, रा.वि. संचालक विश्वास चव्हाण, शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, आण्णासाहेब कोळी, न.पा.मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, बांधकाम अभियंता डिगंबर वाघ, इंजि. निलेश राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमोल देसले धुळे रोड यांनी यावेळी ऑनलाइन दाखला घेतल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले
वेळेसह पैशांची होणार बचत -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी यावेळी ऑनलाइन दाखल्याबाबत होत असलेल्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. अभियंता दिगंबर वाघ यांची छाननी व प्रत्यक्ष परीक्षण करण्याकरिता नियुक्ती केली आहे सर्व कागदपत्रे ऑनलाइन जोडली की तात्काळ दाखला मिळणार असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाचणार आहे.
अतिक्रमण रोखण्यासाठी होणार मदत : नगराध्यक्षा आशालता चव्हाण
पालिकेतील अटी शर्ती ची पूर्तता केल्यानंतर ऑनलाइन दाखला घरबसल्या मिळणार आहे या सोयीचा नव्याने बांधकाम करणार्या नागरिकांना लाभ होईल तर मिळालेली परवानगी प्रमाणे पिलिंथ पातळी पर्यत बांधकाम असल्यास पुढील परवानगी विनासायास मिळणार आहे मात्र मिळालेल्या परवानगी प्रमाणे बांधकाम न करता वाढीव बांधकाम करून अतिक्रमण केले असल्यास ऑनलाइन प्रक्रियेत परवानगी मिळणार नाही त्यामुळे पालिकेला भविष्यात होणारी डोकेदुखी थांबणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना दिली.