चाळीसगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत : 116 केसेस निकाली

0

लोकन्यायालयामार्फत 84 लाखांची वसुली

चाळीसगाव- तालुका विधी सेवा समिती व वकील संघ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 14 रोजी चाळीसगाव न्यायालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात होते. चाळीसगाव न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी.बिहारे, ए.पी.गिरडकर, पी.बी.भरपुरे यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाला सकाळी 10 वाजता दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी न्यायालयातील प्रलंबीत खटले व दाखलपुर्व केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या यात धनादेश च्या 138 कलमाच्या 51 केसेस, मोटारवाहन कायदा कलम अन्वये 300 केसेस व उर्वरीत फौजदारी खटले असे एकूण 463 प्रलंबीत खटले ठेवण्यात आले होते यापैकी 14 धनादेश केसेस, 83 मोटार वाहन कायदा केसेस व उर्वरीत फौजदारी केसेस अशा एकुण 116 केसेस निकाली काढण्यात आल्या. तसेच बँका, ग्रामपंचायती, नगरपालिका, दुरसंचार, वीज वितरण कंपनी यांचे 24 हजार 419 खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते यापैकी तीन हजार 493 खटले तडजोड करुन निकाली काढण्यात आले यात लोकन्यायालयामार्फत शासनाची 84 लाख 66 हजार 62 रुपये ईतकी वसुली करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
लोकन्यायालयाला गटविकास अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्तार अधिकारी बी.एस.बागुल यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले. ावेळी चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष धीरज पवार, सचिव निलेश निकम, सहसचिव राजेश जाधव, खजिनदार ज्योती धर्माणी यांच्यासह वकील बांधव, ग्रामसेवक, पक्षकार उपस्थित होते. न्यायालय सहाय्यक अधिक्षक सुरेश ठाकुर, वरीष्ठ लिपिक गोविंद पवार, कनिष्ठ लिपीक मनोज भालेराव व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.