चाळीसगाव पं.स.तर्फे तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात

0

चाळीसगाव : पंचायत समिती शिक्षण विभाग चाळीसगावच्या वतीने नुकतेच बेलगंगा नगर येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात. इ.1 ली ते 8 वीच्या वर्गासाठी प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तळणी पिलखोड येथील उपक्रम शिक्षक शालिग्राम निकम यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांना गट शिक्षणाधिकारी सचीन परदेशी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. भोई, मुख्याध्यापाक सी.आर. पाटील, पर्यवेक्षक प्रा. कचवे, प्रा. देशमुख, आर.आर.पाटील, नितीन कोठावदे यांच्यासह आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हटट्रीकनंतर चौथ्यांदा विजय
त्यांचे निवडी बद्दल केंद्रप्रमुख सुशील पाटील(पिलखोड), सुनील पगारे (उंबरखेडे), दिलीप सावंत (टाकळी), शिवाजी जाधव, पिलखोड येथिल शाळेचे मुख्याध्यापक व पिलखोड केंद्रातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. यापुर्वी त्यांना विज्ञान प्रदर्शनात लागोपाठ तीन वर्ष प्रथम पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी हॅटट्रीक केली होती. आता चार वेळा झाली आहे . त्यांचा विषय होता लोकसंख्या नियंत्रण एक पर्यावरणीय गरज हा विषय होता. आता त्यांची निवड जिल्हा पातळीवर झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.