चाळीसगाव । येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. शहरातील बस स्टॅन्ड भागात 23 वर्षीय तरुणाचा 1 रोजी रात्री 10.20 वाजेदरम्यान तर भडगाव रोड वरील 21 वर्षीय तरुणाचा नाशिक येथे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत शहरातील लक्ष्मीनगर मधील रहिवाशी रवींद्र शिवाजी गुंजाळ (23) या तरुणाला वडील शिवाजी गुंजाळ याने बसस्थानक परिसरातुन मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रविंद्रचे मृृत्युचे कारण समजले नाही. तर दुसर्या घटनेत 17 जून रोजी नाशिक येथे हलविण्यात आलेला तरुण निलेश पांडुरंग भोई याचा मृत्यु झाला आहे. पहिल्या घटनेत वैद्यकीय अधिकारी बी.पी.बाविस्कर यांच्या खबरीवरुन शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास हवालदार अविनाश पाटील करीत आहेत. तर दुसर्या घटनेत नाशिकचे डॉ.गडे यांच्या खबरीवरुन मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार प्रदीप परदेशी करीत आहेत.