चाळीसगाव-मुक्ताईनगरात रास्तारोको

0

‘पद्मावत’ला विरोध ; चित्रपटाचे प्रदर्शन न करण्याची मागणी

चाळीसगाव/मुक्ताईनगर – पद्मावत चित्रपटाला देशभरात प्रदर्शित करु देवू नये या मागणीसाठी चाळीसगावसह मुक्ताईनगरात गुरुवारी काही वेळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

** चाळीसगावात वाहतूक ठप्प
चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने रास्तारोको केला. महाराणा प्रताप युवा सेना, रयत सेना, संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराणा प्रताप मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

** मुक्ताईनगरात रास्तारोको
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात दुपारी एक वाजेच्या सुमारास करणी सेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी केली. याप्रसंगी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रास्तारोकोमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. पद्मावत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या निषेधाच्या प्रसंगी घोषणा देण्यात आल्या.