चाळीसगाव । तब्बल 4 महिन्यानंतर आज शुक्रवारी चाळीसगाव पालिकेत सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या एकुण 70 विषयांवर चर्चा होऊन नगरपालिकेचे गटनेते माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी मुख्याधिकार्यांसह सत्ताधार्यांना चांगलेच धारेवर धरले सकाळी सुरू झालेली सभा सायंकाळपर्यंत सुरूच होती. यावेळी राजीव देशमुख यांनी पालिकेने घरपट्टीत 10 टक्के वाढ केली आहे. याबाबत नागरीकांकडून हरकती मागविण्यात येणार होत्या. परंतू मार्च महिना जवळ आला आहे. या बाबी आगोदर करणे गरजेचे होते. आता ऐनवेळी याबाबी केल्यानंतर बसुलीत घट होणार असून पालिकेचे आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सत्ताधारी हे संख्याबळाचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबून मनमानी कारभार करत आहे. मागी सभेत आम्ही सांगितले बदल न करता ते फेटाळून लावले व आमच्या सदस्यांनी केलेले सुचनाचे पालन का केले नाही याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना धारेवर धरले.
विकासासाठी एकत्र यावे – नगराध्यक्षा
यावेळी नगराध्यक्षा अशालता चव्हाण यांनी शहराचा सर्वांगिन विकास करण्याचा आमचा हेतू आहे. सदस्यांनी केवळ विरोधसाठी विरोध न करता जनतेच्या हितासाठी विचार करवा असे सांगितले. यावेळी शहराचा विकासचा मुद्दा लक्षात घ्यावा विरोधक हे प्रशासनाचा आवाज दाबण्याचा आरोप आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी केला. दरम्यान घनकचरा टेंडरबाबत ज्या अटी व शर्ती बदविल्या होत्या त्याचा मुद्द लोकनेत स्व. अनिलदादा देशमुख शहरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थित करून नगरपालिकेचे आर्थिक हित पाहता ज्या सुचना मांडल्याचा ठरावावर मतदान घेण्यात आले. मात्र यावेळी सत्ताधार्यांना 1 मत कमी मिळाल्याने व आघाडीच्या पारड्यात 1 मत जास्त पडल्याने हा चर्चेचा विषय झाला. याप्रसंगी सत्ताधारी, विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा होऊन सभा आटोपती घेण्यात आली.