चाळीसगाव : तालुकयातील खडकी बु येथील एमआयडिसीतील खदानीत गावठी दारू तयार करण्याची भट्टी सुरु असल्याची माहिती डीवायएसपी अरविंद पाटील यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक व पथकाने 9 डिसेंबर 2016 रोजी त्या ठिकाणी छापा मारून गावठी दारू तयार करण्याचे 40 हजार रुपये किमतीचे सुमारे 70 लिटरचे 20 बॅरेल रसायन जागेवर नाश करून भट्टी व साहित्य उध्वस्त केले आहे. दोन आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
गुप्त माहितीनुसार टाकला छापा
तालुक्यातील खडकी बु। येथील औद्योगिक वसाहतील भारत वायर रोपवेच्या पाठीमागे असलेल्या खदानीत गावठी दारूची भट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी अरविंद पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 9 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 2:45 वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोउनि विजयकुमार बोत्रे, युवराज रबडे, हवालदार शशिकांत पाटील, पोलीस नाईक अरुण पाटील, योगेश मांडोळे, पो. कॉ. राहुल पाटील, बाप्पू पाटील, नितीन पाटील, प्रभाकर पाटील यांनी छापा मारून गावठी दारू तयार करण्याचे 40 हजार रुपये किमतीचे सुमारे 70 लिटरचे 20 बॅरेल रसायन जागेवर नाश करून गावठी दारू तयार करण्याचे साहित्य ड्रम, लोखंडी टाक्या हे फोडून इतर साहित्य उध्वस्त केले आहे. पोलिसांचा सुगावा लागताच त्या ठिकाणी असलेलं दोघे आरोपी अनिल मोरे व विजू जिरेकर हे फरार झाले असून त्यांचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला पो कॉ राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून 65(ग) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहे.