चाळीसगाव पोलिसांचे अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरूच

0

चाळीसगाव । ग्रामीण पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे रुजू झाल्यापासून त्यांनी अवैध धंद्यांवर छापे मारण्यास सुरुवात केली स्वतः कर्मचार्‍यांसह तालुक्यातील वाघळी तितूर नदीपात्रात सट्टा घेणार्‍याला ताब्यात घेतले असून त्याचे वर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे ग्रामीण भागातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. 3 जून 2017 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, हवालदार किशोर पाटील, शामकांत सोनावणे यांनी तालुक्यातील वाघळी येथे तितूर नदीच्या पात्रात अवैधरित्या सट्टा मटका घेताना उत्तम देवचंद गायकवाड (50) रा वाघळी ता चाळीसगाव यास सट्टा घेतांना ताब्यात घेतले असून त्याचे कडून 260 रुपये रोख व सट्टा जुंगराची साधने ताब्यात घेतली आहेत. त्याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पो.कॉ. हिराजी देशमुख यांचे फिर्यादीवरून 12(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार किशोर पाटील करीत आहे.