चाळीसगाव । चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व डीबीचे कर्मचारी यांनी 24 घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस व एमआयडसी मधील अंबुजा कंपनीतील चोरीतील आरोपींना मुद्देमालसह तसेच हिरापूर रोडवरील देवरे दांपत्याच्या खुनातील आरोपीला अटक करुन तीन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला.
याबद्दल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि रामेश्वर गाडेपाटील, सपोतनि राजेंद्र रसेडे, डीबीचे हवालदार शशिकांत पाटील, बापूराव भोसले, पो कॉ बापू पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई, गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, संदीप जगताप यांचा ज्येष्ठ पत्रकार तथा माजी सरपंच किसनराव जोर्वेकर व चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे सचिव एम बी पाटील व पत्रकार मोतीलाल अहिरे, रमेश जानराव, सुर्यकांत कदम, अजीज खाटीक, उमेश बर्गे, गणेश पाटील, शरद पाटील, अनिल शिरसाठ, विशाल कारडा आदी पत्रकार बांधवांनी पुष्पगुछ व शाल देवुन सत्कार करण्यात आला.