चाळीसगाव । शहरातील रेल्वे स्टेशन परीसरात असलेल्या पोलीस चौकीची सहाय्यक फौजदार संजय पंज यांनी वरिष्ठांच्या आदेशाने व नागरिकांच्या दातृत्वातुन कायापालट केली आहे. वरीष्ठांकडून त्यांचा कौतुक होत आहे. चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील व रेल्वे स्टेशन परीसरातील स्टेशन विभाग पवारवाडी खडकी बु., शिंधी कालनी, अनिल नगर, दत्त वाडी, छाया दी ग्राम सोसायटी, आदर्श नगर, हनुमान वाडी आदी भागाच्या हद्दीतील पोलिस चौकीची अवस्था काहीशी दयनीय झाली होती.
या चौकीवर सहाय्यक फौजदार म्हणून संजय पंजे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रंशात बच्छाव, पोलीस उपअधीक्षक पी अरविंद पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शना खाली परीसरातील दातृत्वातुन पोलीस चौकीची रंगरगोटी व सुशोभिकरण केले आहे. चौकीत महिला समुपदेशनचे कामकाज पाहणारे विठ्ठल पाटील, पुनम जगदाळे यांचे सहकार्य लाभले.