चाळीसगाव बसस्थानकाचे रूप पालटणार

0

चाळीसगाव । गेल्या अनेक वर्षापासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बसस्थानकाचे जवळपास 90 लाख रूपये खर्च असलेले दुरूस्ती व नुतणीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पुर्ण होऊन परीसरात क्रॉक्रिटीकरण होऊन सर्व कार्यालय अत्याधुनिक होणार असल्याची माहिती आगार प्रमुख संदीप निकम यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना दिली आहे. चाळीसगाव बसस्थानकात अनेक सुविधा असल्याने त्याचप्रमाणे परीसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन प्रवाश्याना गाडीत चढणे व त्या ठिकाणाहून पायी चालणे कठीण झाले होते. अश्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या बसस्थानकाची समस्या अनेकांनी निवेदन देवून आंदोलन केली तश्या अश्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध देखील झाल्या होत्या. आमदार उन्मेश पाटील यांनी सतत पाठपुरावा करून अखेर बसस्थानक डागडुजी व नुतनीकरणासाठी 1 कोटी रूपये मंजूर करून या कामाची सुरूवात गेल्या काही महिन्यांपासून झाली आहे.

तीन जिल्ह्याच्या सिमेवर तालुका
तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या चाळीसगाव तालुका हा जवळपास 144 खेड्यांचे दळणवळणाचा मुख्य केंद्रबिंदू असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. आणि या सर्वच गावान जोडणारा मुख्य केंद्र बिंदू म्हणजे शहरातील बसस्थानक असून या बसस्थानकाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत होती. त्यातच एक कोटीचा निधी प्राप्त झाल्याने बसस्थानकाच्या सर्व समस्या सुटणार आहेत. बसस्थानकाच्या लागून असलेल्या सर्व दुकानांचे स्थलांतर स्थानकामागील संरक्षण भिंती लगत करण्यात आले असून या दुकानदारांना नव्याने दुकाने थाटण्यासाठी जागा देण्यात आली असून काहीचे नुतनीकरण होणार आहे. समोरच असलेल्या दर्शनी भागातील दुकाने स्थलांतर केल्यानंतर त्याठिकाणी व परीसरात पेवरब्लॉक बसविण्यात येणार असून स्थानकाच्या आवारात व परीसरात काँक्रीटीरण होणार आहे. स्थानकाच्या परीसरात असलेले संपुर्ण कार्यालय अत्यधुनिक होणार असून वाहतूक नियंत्रण कंक्ष शेजारीच असलेल्या अत्याधुनिक नविन जागेत स्थलांतरीत होणार त्याप्रमाणे बाहेरून येणारे व स्थानिक महिला व पुरूष चालक वाहकांसाठी विश्रांतीगृह देखील या ठिकाणी होणार असून या सर्व कामांमुळे बसस्थानकाचे रूप पालटणार आहे.

प्रवाश्यांची गैरसोय थांबणार
अत्याधुनिक अशा या बसस्थानकाचे काम पुर्ण झाल्यावर त्याला नविन झळाळी येणार असल्यामुळे मागील काळात प्रवाश्याची होणारी गैरसोय आता मात्र होणार नाही. त्याप्रमाणे परीसररात काँक्रीटीकरण व पेवर ब्लॉक बसविल्याने धुळे माती व चिखल आता होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अगोदरच सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने आता होणार्‍या काही घटना या सिसिटिव्ही कॅमेर्‍यात कक्षेत येणार आहे. लवकरच हे काम पुर्ण होणार आहे.

जवळपास 40 वर्षानंतर बसस्थानकाला 1 कोटी रूपये निधी मिळाला असून चाळीसगाव बसस्थानकाच्या समस्या सोडविण्याचे समाधान असून तालुक्याचे महत्वाचे दळणवळण असलेले केंद्र विकसीत होणार आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार आहे.
– उन्मेश पाटील, आमदार, चाळीसगाव