चाळीसगाव बसस्थानकात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम; चौकशीची मागणी

0

चाळीसगाव । गेल्या अनेक वर्षापासून चाळीगाव बसस्थानकातील स्वच्छतेचा प्रश्‍न व पावसाळ्यात चिखल गारा यामुळे बसचालक आणि प्रवासी मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून 90 लाख रूपये मंजूर होऊन बसस्थानकाचे काम सुरू झाले मात्र संबंधित ठेकेदार या कामावर माती मिश्रीत वाळू वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर कामाची गुणवत्त नियंंत्रक विभाग (नाशिक) कडून चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

चाळीसगाव दळणवळणाचा मुख्य कणा
चाळीसगाव तालुक्याचा दळणवळणाचा मुख्य कणा म्हणून चाळीगाव बस आगाराकडे पाहिले जाते. त्याप्रमाणे जिल्हा, राज्य अथवा राज्याबाहेर जाण्यासाठी बरेचसे प्रवाशी चाळीसगाव बसस्थानकतू प्रवास करतात, मात्र गेल्या अनेक वर्षापासून बसस्थानक व आवाराची दयनीय परिस्थिती झाल्याने अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षाीं आवाज उठवून निवेदन देत आंदोलन केली. त्यानंतर आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून 90 लाख रूपये मंजूर होऊन अखेर मोठा गाजावाजा करून बसस्थानकातील कामाला सुरूवात झाली. ठेकेदाराने मात्र मनमानी पद्धतीने काम सुरू केले असून या कामासाठी चक्क मातीमिश्रीत वाळूचा वापर सुरू केल्याने लाखो रूपये खर्च करून या कामाची योग्यता ठासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाल्यातील मातीमिश्रीत वाळूचा वापर
ठेका घेतांना चांगल्या वस्तू, वाळू, वापरणे बंधनकारक असतात ठेकेदार माती मिश्रीत वाळू वापरत असल्याने या कामाचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरीष्ठ स्तरावरून या कामाची चौकशी व्हावी, त्याचप्रमाणे नाशिक विभागाच्या गुणवत्ता नियंत्रक विभागकडून चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान चाळीसगाव तालुक्याचा वाळूचा ठेकाच बंद असल्याने ठेकेदार कोणत्या तरी नाल्याची माती मिश्रीत वाळू कामावर वापरत असल्याचा संशय व्यक्त होत आहेे. दरम्यान नाल्याची मिश्रीत वाळू वापरल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.