चाळीसगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली

0

चाळीसगाव :  कृउबास मध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मक्याच्या आवकमध्ये विक्रमी वाढ झाली असून त्यामुळे मक्याच्या बाजार भावात काही प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहे. तालुक्यात यंदा चांगल्या पावसामुळे मक्याचे उत्पन्न शेतकर्‍यंना मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी आणला जात आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कृउबासमध्ये सतत 200 ते 250 ट्रॅक्टर मक्याची आवक होत असून यामुळे मका लिलावाला खरेदीदार मोठ्या प्रमाणावर येत आहे. यात स्थानिक व्यापार्‍यांसह बाहेरगावच्या व्यापार्‍यांचाही समावेश आहे.

व्यापार्‍यांमुळे योग्य भावासाठी शेतकर्‍यांची उडते तारांबळ
लिलाव प्रक्रियेमध्ये साधारण 1250 ते 1100 रुपयेपर्यंत मक्याचा भाव निघतो. तर बर्‍याच वेळेस पहिल्या दिवशी जर 1200 भावाने मका विकला गेला असेल तर भाव वाढल्याच्या चर्चेने दुसर्‍या दिवशी शेतकरी चांगला भाव मिळेल म्हणून आपला माल बाजार समितीत विक्रीस आणतात. मात्र, अचानक वाढलेल्या मालामुळे व्यापारी भावात लगेच घसरण होते. पहिले दोन ते तीन ट्रॅक्टर जास्त भावाने खरेदी केले जातात. व नंतरचे कमी भावाने खरेदी केले जाते. यामुळे शेतकर्‍यांचा भ्रमनिरास होतो. यासाठी कृउबा समितीने शेतकरी व व्यापारी यांना सुचना देण्याची गरज आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरातील ऑनलाईन बाजारभाव बघून त्याप्रमाणे खरेदी व्हावी म्हणून व्यापार्‍यांवर लक्ष देवून असतो. मात्र, ओला व सुका मक्याच्या भावात तफावत होऊ शकते. सुका मका जर 1300 रुपये जात असेल तर ओला मका 1100 ते 1150 पर्यंत जावू शकतो. चांगला भाव मिळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे