चाळीसगाव । सहकार महर्षी स्व.रामराव जिभाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी सहकाराच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा आणि कारखाना उभा झाल्यास तालुक्यातील शेतकर्यांना एक प्रकारे हक्काची सावली कायमस्वरुपी मिळेल, या उदात्त हेतूने बेलगंगा सहकारी साखर कारखानाची निर्मिती केली होती. परंतु आजमितीस राजकरण्याच्या अनास्थेमुळे ती सगळीच आज उघड्यावर आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत उघडी पडली असल्यामुळे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी मात्र बेलगंगा सुरू करण्यासाठी उदासिनता
विशेष म्हणजे, ज्या शेतकरी बांधवांसाठी बेलगंगा उभा केला गेला आहे. तेच शेतकरी बांधवच बेलगंगा साखर कारखाना सुरु व्हावा, याबाबत उदासिन झालेले दिसत आहेत आणि याचाच फायदा घेत काही मंडळी एकेकाळचे तालुक्याचा वैभव असलेला बेलगंगा साखर कारखाना जागेसह गिळकृत करण्याच्या तयारीत आहे. कारण जिल्हा बँकेने कारखाना विक्री प्रक्रिया सुरु केली तरी देखील कुणीही पुढे येऊन तो वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाही.
सहकार तत्वावरच सुरू करण्याची मागणी
तालुक्यातील सर्व पक्षीय राजकारणी मंडळींना देखील संभाजी सेनेच्यावतीने आवाहन करण्यात आले. तसेच बेलगंगा सह.साखर कारखाना पुन्हा नव्याने स्व.रामराव जिभाऊ बेलगंगा सहकारी साखर कारखाना या नावाने सुरू करा आणि तो सहकार तत्वावरच सुरू करावा, असेही सेनेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी संभाजी सेनाचे संस्थापक बापुसाहेब शिरसाठ, शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाजन, ता.अध्यक्ष गिरीष पाटील, सचिव विजय गवळी, शहर उपाध्यक्ष अविनाश काकडे, प्रविण पाटील, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, भरत नेहारे, बंटी नवले, बंटी पाटील, नामदेव पाटील, विजय देशमुख, संदीप जाधव आदी सहभागी होते.